मिरज दि. ३० जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)


संस्कार भारती चे कार्य हे समाजाला दिशा देणारे व प्रेरणादायी आहे. समृद्ध भारत घडविण्याचे महान कार्य संस्कार भारती सारख्या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून होईल असे प्रतिपादन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केले. संस्कार भारती मिरज महानगर समितीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त भारतमाता पूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. मालगाव येथील हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्यासाठी लढलेल्या हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी आधार जेष्ठ नागरिक संस्थेचे प्रमुख अंजुमन खान, सौ. निर्मला बस्तवडे यांचे मार्गदर्शन पर मनोगते झाली. मिरज येथील मुक्तांगण सभागृहामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या क्रांतिकारकांच्या स्थानिक कलाकारांनी काढलेल्या चित्रांचे, शिल्पकृतींचे, रांगोळीचे आणि मिरजेतील स्वातंत्र्य सैनिकांच्या फोटोंचे प्रदर्शन आयोजित केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. विनोद शिराळकर यांचे हस्ते झाले. या नंतर ओंकार शिखरे आणि सौ. स्वरदा शिखरे यांनी संस्कार भारतीच्या ध्येयगीत गायली. संगीत नाटक अकादमीचाचा अखिल भारतीय स्तरावरील पुरस्कार मिळवणारे मिरजेचे सुपुत्र मा.माजीद सतारमेकर यांचा सत्कार सुरेशभाऊ खाडे यांचे हस्ते करण्यात आला
ॲड.श्री.संभाजीराव मोहिते यांनी ‘चला देश घडवूया’ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संयोजन संस्कार भारती अध्यक्षा श्रीमती राजश्री शिखरे, सचिव श्रीधर देसाई यांनी केले. सूत्रसंचालन सौ.तनुजा पाटील यांनी केले, प्रास्ताविक डॉ. अनिता नातू यांनी केले. ॲड.सी.जी.कुलकर्णी यांनी आभार मानले. सुहास दिवेकर यांनी गायलेल्या संपूर्ण वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.