संदीप यादव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

तासगाव, ता. 24(महाराष्ट्र मराठी वृत्तसेवा)

तासगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व जिव्हाळा सोशल फाउंडेशनचे सचिव संदीप यादव यांना प्रतिष्ठा फाउंडेशनचे या सामाजिक संस्थेच्या वतीने २०२३ चा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. येथील समृद्धी हॉल येथे संपन्न झालेल्या प्रतिष्ठा फाउंडेशनच्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी संमेलन अध्यक्ष जेष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर, युवा नेते डॉ.जितेश कदम, जेष्ठ साहित्यिक प्रा. बाबुराव गुरव, आयडियल कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश अवताडे, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने पाटील, मराठा उद्योजक विकास संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील, युवा नेते राजीव मोरे, कवी संमेलनाच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध कवयत्री मनीषा पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत यादव यांना प्रतिष्ठा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रतिष्ठा फाउंडेशनच्या वतीने गेली ७ वर्षापासून साहित्यिक, उद्योगरत्न, क्रीडारत्न, आरोग्यरत्न, प्रशासनरत्न, लोककलारत्न, छायाचित्रकार, समाजरत्न, शिक्षणरत्न, सरपंचरत्न अशा समाजातील विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या अनेक व्यक्तींना प्रतिवर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येत. यावर्षी तासगाव येथील संदीप यादव यांच्या सामाजिक कार्याचे दखल घेऊन फाउंडेशनने त्यांची समाज रत्न या पुरस्कारासाठी निवड केली. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.