सरस्वती का सावित्रीमाई? या चित्रपटाचा प्रीमियर

1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे होणार प्रक्षेपण

कोल्हापूर, शनिवार दि.29 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) निर्मिती फिल्म क्लब निर्मित सरस्वती का सावित्रीमाई? या अतिशय महत्वाच्या व संवेदनशील मराठी दीर्घ लघुचित्रपटाचा प्रीमियर शो मंगळवार दि. 1 ऑगस्ट, 2023 रोजी दुपारी 4:30 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे.सरस्वती का सावित्रीमाई? या चित्रपटाची संकल्पना धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टची असून निर्मिती निर्मिती फिल्म क्लबने केली आहे. दिग्दर्शन अनिल म्हमाने, माहेश्वर तेटांबे, निर्मात्या डॉ. शोभा चाळके, सहनिर्माता अनिरुद्ध कांबळे, क्रियेटिव्ह हेड ॲड. करुणा विमल, सहदिग्दर्शन अरहंत मिणचेकर यांचे तर संकलन राजवीर जाधव यांनी केले असून डी.ओ.पी. म्हणून अमर पारखे यांनी काम केले आहे.कथा आणि संवाद अनिल म्हमाने यांची असून आदित्य म्हमाने, कनिष्का खोबरे, तक्ष उराडे, अमिरत्न मिणचेकर, स्वरा सामंत, मंथन जगताप, अनघा सुतार, पुष्कर कुसूरकर, अन्वय म्हमाने, स्वराज किरवेकर, स्वरल नामे, अतीफ काझी, पृथ्वीराज वायदंडे, वेणू तिप्पाण्णावर, श्रीजा पाटील, इझयान मुरसल, ऋतुजा शिंदे, विघ्नेश शिंदे, प्रांजल सुरवशी, प्रित्युश्री सुरवशी, नाज कुरणे, अरिज कुरणे, प्रिया नलवडे, प्रणव कुलकर्णी, राजलक्ष्मी लिमजे, किशोर खोबरे, डॉ. निकिता खोबरे, शण्मुखा अर्दाळकर, शब्बीर काझी, छाया पाटील, संजयकुमार अर्दाळकर, नामदेव मोरे, अरिफ काझी, डॉ. स्नेहल माळी, रुपेश कुसूरकर, जयश्री नलवडे, सुषमा शिंदे, आयेशा काझी, शाहरुख मुजावर, मुनिरा मुजावर, प्रकाश किरवेकर, संगीता लिमजे यांच्यासह शंभरहून अधिक कलाकारांनी यात काम केले आहे.हा चित्रपट पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दिग्दर्शक अनिल म्हमाने यांनी केले आहे.