सांगली जिल्ह्यात एस टी चालकाची आत्महत्या

पगार वेळेवर होत नसल्याने वैफल्यग्रस्त होऊन केले कृत्य

सांगली, दि.16 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी वृत्तसेवा) कवठेमहांकाळ एस टी डेपोतील चालक भीमराव सूर्यवंशी (रा.शिरढोण ता. कवठेमंकाळ) यांनी पगार वेळेवर होत नसल्याच्या कारणाने वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

एस टी महामंडळ तील कर्मचाऱ्यांचे कोरोना काळापासून गेल्या दोन वर्षातील पगार वेळेवर होत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातूनच अनेक कर्मचारी वैफल्यग्रस्त होत आहेत. गेल्या दोन वर्षात राज्यातील अनेक राजकीय पक्ष व राजकारणी मंडळींनी त्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली आहे. चालक सूर्यवंशी यांची ही त्याच मुळे दयनीय अवस्था झाल्याने त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असावे. या घटनेने पुन्हा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.