साई अनिरुद्ध उपासना केंद्राच्या वतीने रक्तदान शिबीर

शिराळा, दि.24 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) कोकरूड ता.शिराळा येथे अनिरुद्ध अकॅडमी व साई अनिरुद्ध उपासना केंद्र कोकरूड यांच्या संयुक्त विद्यमाने निनाई मंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन कोकरूड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते यांचे हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या समाजसेवी उपक्रमात एकूण ७६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत ४१ बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. ३५ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यासाठी यशवंतराव चव्हाण ब्लड बँक कराड यांचे सहकार्य लाभले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, प्राध्यापक ए.सी.पाटील, विश्वासचे संचालक सुहास पाटील, माजी सरपंच श्रीरंग नांगरे, बाजार समितीचे संचालक सुजित देशमुख, उदय ग्रामीणचे चेअरमन बाजीराव घोडे, मोहन घोडे, उत्तम चव्हाण, दिलीप पाटील, नारायण नांगरे, बबन नांगरे, राजेंद्र घोडे, शारदा चव्हाण, सुवर्णा नांगरे, सुनीता शिंदे आदींसह साई अनिरुद्ध उपासना केंद्राचे सर्व सेवक वर्ग उपस्थित होते.