सांगली, दि.1 मार्च 2023 (प्रतिनिधी – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) महाराष्ट्र राज्यातील माळी समाजाच्या न्याय हक्कासाठी राज्यभरात संघटनात्मक कार्य करणाऱ्या सावता परिषदेचे पाचवे त्रेवार्षिक अधिवेशन शनिवार दिनांक 4 मार्च रोजी अकरा वाजता नंदनवन लॉन्स अहमदनगर येथे दोन सत्रांमध्ये होत आहे. या अधिवेशनासाठी राज्यभरातील माळी समाज बांधवांनी हजारो हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सावता परिषदेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष महेश माळी-लाटवडे यांनी केले आहे. ते म्हणाले, माळी समाजाच्या प्रश्नावर मंथन करण्यासाठी अहमदनगर येथे होणाऱ्या पाचव्या त्रेवार्षिक अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन होत आहे. समाजकार्यासाठी समाज संघटन हे ब्रीद घेऊन संघटना राज्य विस्तारामध्ये कल्याणराव आखाडे यांच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय कार्य करत आहे समाज कार्याच्या ठिकाणी शंभर टक्के राजकारण असे कार्य संघटना करीत आहे. या कार्यात आपणही सामील व्हावे समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या विचारांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. या अधिवेशनात अहमदनगरचे प्रथम महापौर भगवान फुलसुंदर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, नामदेव देवा राऊत, भास्करराव आंबेकर, शंकरराव बोरकर, करण ससाने, बाळासाहेब बोराटे, अनिल झोडगे, छगन मेहत्रे, शरद झोडगे, कारभारी जावळे, माणिक विधाते, विजय कोथंबीर, महेश निमोणकर, विनायक घुमटकर, जगन काळे-पाटील, संजय जाधव, रमेश बारसकर, अजिनाथ हजारे, देवराम शिंदे, किसनराव रासकर, लक्ष्मण ढवळे, खंडोबा राम पेरकर, कृष्णाजी यादव, बाळासाहेब नरके, संतोष कोल्हे, दत्तात्रय शेंडे, प्रवीण डोंगरे, तुषार जाधव, पप्पूजी भोग, लक्ष्मण डोमकावळे, तुकाराम चेडे, अमृता रसाळ, कैलास गाडीलकर, नितीन गोरे आदींची सह सामाजिक शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यकामाचे संयोजन सावता परिषदेचे प्रदेश मुख्य संघटक संतोष राजगुरू, प्रदेशाध्यक्ष मयूर वैद्य प्रधान सचिव गणेश दळवी, प्रदेश उपाध्यक्ष महादेव ताटे, साधना राऊत, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष मनीषा सोनमाळी, प्रदेश संघटक श्रीकांत माळी, शिवाजी येवारे, प्रदेश सचिव विजय शेंडे, प्रदेश संघटक बापूराव धोंडे यांनी केले आहे. या अधिवेशनात राज्यातील माळी समाज बांधव हजेरी लावणार असुन सांगली जिल्ह्यातील सावता सैनिकांसह माळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन परिषदेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष महेश माळी-लाटवडे व युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण डबाने यांनी केले आहे.
