सावता परिषदेचा सोळावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
भरणेवाडी, दि. 31 जानेवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)
समाज संघटन ही काळाची गरज असून कल्याण आखाडे यांनी राज्यभर संघटनेच्या माध्यमातून ताकद निर्माण केली आहे. सावता परिषद म्हणजेच समाज परिवर्तन असे सूत्र तयार झाले आहे असे गौरवउद्गार माजी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी काढले. भरणेवाडी ता. इंदापूर येथे आयोजित सावता परिषदेच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य संघटक संतोष राजगुरू, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल ननवरे, तालुका अध्यक्ष प्रकाश नेवसे, तालुका युवा आघाडी अध्यक्ष अमर बोराटे, तालुका कार्याध्यक्ष विष्णू झगडे, तालुका संघटक सुहास बोराटे, तालुका सोशल मीडिया प्रमुख सचिन शिंदे, भोडणी शाखाध्यक्ष अजय गवळी, मार्गदर्शक रामदास बनसोडे, दादासाहेब भिसे, विजय महाजन, विकास सोसायटीचे संचालक महादेव शेंडे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.
माजी मंत्री दत्ता मामा भरणे म्हणाले, सावता परिषदेचे कार्य महाराष्ट्रात खूप मोठे आहे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी खूप मोठ्या संघर्षातून संघटना उभी केली आहे. परिषदेचे प्रदेश मुख्य संघटक संतोष राजगुरू हे परिषदेचे विचार समाजापर्यंत पोहोचवीत आहेत. परिषदेच्याच्या माध्यमातून माळी समाजाला दिशा देण्याचे काम सावता परिषद ही संघटना करीत आहे. माळी समाजा च्या अस्मितेच्या प्रश्नावरती वेळोवेळी आवाज उठवण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून आखाडे साहेबांनी केलेले आहे. सावता परिषदेचा १६ वा वर्धापन दिन श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज याच्या प्रतिमेस पुष्पहार घालून संपन्न झाला.
