सावळजमध्ये सर्पदंशाने विद्यार्थिनीचा मृत्यू

सावळज, बुधवार दि. 23 ऑगस्ट 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील सावळज येथील प्रांजल प्रमोद माळी (वय 8) या विद्यार्थिनीचा मंगळवारी रात्री सर्पदंशाने मृत्यू झाला. प्रांजल ही येथील एस के उनउने इंग्लिश स्कुल या शाळेत इयत्ता 3 री मध्ये शिकत होती. मंगळवारी रात्रीच्या 11 च्या सुमारास प्रांजलला राहत्या घरात विषारी सापाने दंश केला. यानंतर तिला उपचारासाठी तात्काळ येथील बालाजी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु प्रांजल अधिकच अत्यावस्थ असल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान उपचार सुरु असतानाच प्रांजलचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची बातमी सावळजमध्ये वाऱ्यासारखी पसरली. तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण सावळज गावावर शोककळा पसरली आहे.