शिराळा, दि.19(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) सोनवडे (ता.शिराळा) येथील कुंभार समाज बांधवांच्यावतीने सालाबादप्रमाणे यावर्षी आयोजीत श्री.संत गोरोबा कुंभार पुण्यतिथी सोहळा उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. पुण्यतिथी सोहळ्याच्या प्रारंभी संत गोरोबा काकांच्या प्रतिमेचे पुजन श्रीपती कुंभार, दादू कुंभार, बाबु कुंभार, राजाराम कुंभार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
दरम्यान या पुण्यतिथी सोहळ्याच्या निम्मित्ताने ह.भ.प.बाजीराव महाराज, ह.भ.प वाल्मीक महाराज, ह.भ.प.नथुराम महाराज यांनी आपल्या किर्तनातुन ज्ञानदान केले. मंगळवारी सकाळी काल्याचे किर्तन झाल्यानंतर दिंडी सोहळा काढण्यात आला त्यानंतर गोरोबा काकांच्या प्रतिमेवर फुले वाहुन पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली.
यावेळी श्री संत गोरोबा कुंभार कला क्रिडा सांस्कृतिक मंडळाच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा पुण्यतिथी सोहळा यशस्वी होण्यासाठी बाबासो कुंभार, प्रकाश कुंभार, गोरख कुंभार, कोंडीबा कुंभार, सचिन कुंभार, मच्छिंद्र कुंभार, संपत कुंभार, नथुराम कुंभार, संग्राम कुंभार, आनंदा कुंभार, विठ्ठल कुंभार, शिवाजी कुंभार यांनी परीश्रम घेतले. दरम्यान यावेळी ग्रामविकास अधिकारी बुधाजी कडवेकर, रामराव पाटील, बाळु पाटील, तानाजी कुंभार, भगवान पाटील व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
