सोनवडे येथील कुस्ती मैदानात कुमार पाटील विजयी

शिराळा, दि. २५ फेब्रुवारी २०२३ (नथुराम कुंभार – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सोनवडे ता. शिराळा येथे संत सतुबुआ भंडार्‍या निम्मीत्त आयोजीत कुस्ती मैदानात प्रथम क्रमाकासाठी पै. कुमार पाटील, शित्तुर विरीध्द पै अक्षय ब्राह्मणे यांच्यात झालेल्या प्रेक्षणीय कुस्तीत पै.कुमार पाटील याने गदालोट डावावर विजय मिळवला. दुसर्‍या क्रमांकासाठी पै सुरज पाटील विरुध्द इंद्रजित मुळे यांच्यात झालेल्या कुस्ती लढतीत पै.सुरज पाटिल हा बॅक थ्रो डावावर विजयी झाला. तिसर्‍या क्रमांकासाठी पै दत्ता बाणकर विरुध्द पै नवीन कुमार यांच्यातील अतितटीच्या लढतीत दत्ता बानकर याने पोकळ घिस्सा या डावावर विजय मिळवुन उपस्थितांची वाहवा मिळवली. उदघाटन सोनवडेचे माजी सरपंच व विश्वासचे माजी संचालक – शामराव नाईक, उपसरपंच- सर्जेराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी युवराज नाईक, बाबुराव नांगरे, सुधीर बाबर, संतोष जाधव, सचीन नाईक, विलास नांगरे, सुर्यकांत नाईक, अरुण पाटील, प्रताप नाईक, प्रकाश लोखंडे, संदिप नाईक, दत्ता नाईक, रविंद्र यादव, पै.अशोक सावंत, लक्ष्मण कदारे, वसंत मोहीते, प्रकाश भाष्टे, शरद मोहीते, सागर बाबर उपस्थीत होते. यावेळी पंच म्हणुन रंगराव पाटील, रविंद्र निंगरे, दत्ता नाईक, ज्ञानदेव नांगरे, सदाशिव, आनंदा पाटिल, मनोज मस्के, सुरेश पाटील यांनी काम पाहीले. समालोचन सुरेश जाधव यांनी केले.