सोनवडे, दि.28 जानेवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) नथुराम कुंभार
सोनवडे(ता.शिराळा) येथे रथसप्तमीनीम्मीत्त आयोजीत करण्यात आलेला श्री.संत तुकाराम महाराज गाथा पारायण व अखंड हरीनाम सप्ताह भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला.
सोनवडे येथील ग्रामदैवत श्री जोतिर्लिंग मंदिरामध्ये रथसप्तमीनिम्मीत्त आयोजीत केलेल्या गाथा पारायण सोहळ्यामध्ये बाजीराव जाधव,वाल्मीक डवरी,दादु कुंभार यांचे नेतृत्वाखाली गाथावाचन, हरिपाठ,भजन,किर्तन यासारखे दैनदिन कार्यक्रम पार पडले.सोहळ्याच्या सांगता समारंभाच्या निम्मित्ताने ग्रंथावरती पुष्पवृष्टी करुन उपसरपंच सर्जेराव पाटील व छाया पाटील यांचेहस्ते ग्रंथपुजनाची सांगता करण्यात आली तसेच यावेळी सोनवडे गावातुन दिंडी सोहळा काढण्यात आला यामध्ये पारंपारीक वेश परीधान करुन गावातील महीला पुरुष,युवक,बालगोपाळ सहभागी झाले होते.यावेळी प्रमोद महाराज,अजीत महाराज यांनी मृदंगवादनाने किर्तनात रंगत भरली.
सोनवडे येथील पारायण सोहळा यशस्वी होण्यासाठी दादु कुंभार,भगवान पाटिल,गोरख डवरी,बाबासो कुंभार,विक्रम पाटील,प्रकाश कुंभार, यांचेसह सोनवडे येथील पारायण मंडळ व ग्रामस्थांनी परीश्रम घेतले.
