सोनवडे शाळेत शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

चांदोली, शुक्रवार दि. 20 ऑक्टॉबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सोनवडे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. महाराष्ट्र शासनाकडून मराठी गणित व इंग्रजी या विषयाकरिता प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडून संच प्राप्त झाले असून या शिक्षण परिषदेच्या माध्यमातुन त्या साहित्याचा अध्ययन व अध्यापन प्रक्रियेमध्ये प्रभावीपणे वापर व्हावा या हेतुने “पेटी उघडा गुणवत्ता वाढवा” या विषयावर चर्चा झाली तसेच यावेळी तज्ञ मार्गदर्शकांनी प्रात्यक्षिक करुन या दाखवले. प्रारंभी जि.प. शाळेच्या शिक्षिका अस्मिता घोलपे यांनी प्रास्ताविक केले तसेच या शिक्षण परिषदेवेळी आशिष आंबुलकर, पुनम मसुटगे, श्रीकांत दाभोळकर यांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी वरिष्ठ मुख्याध्यापक तानाजीराव खोत ,केंद्र मुख्याध्यापक सी.टी. बेलवलकर, बीआरसी शिराळा चे साधन व्यक्ती हाके ,मारुती साळवी,मुख्याद्यापक – सी.एम.पाटील यांचेसह केंद्रातील सर्व प्राथमिक शिक्षक,शिक्षिका उपस्थित होते.