स्पर्धा परीक्षेसाठी जिद्द, चिकाटी आणि सातत्य आवश्यक – शशिकांत बोराळकर

तासगाव, गुरुवार दि.12 ऑक्टॉबर 20233 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अधिकारी होण्यासाठी नियमित अभ्यास, स्पर्धा परीक्षेसाठी जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य आवश्यक आहे असे प्रतिपादन युनिक अकॅडमी कोल्हापूरचे चेअरमन शशिकांत बोराळकर यांनी तासगाव येथील पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात केले. स्पर्धा परीक्षा विभाग व युनिक अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने एम.पी.एस.सी व यु.पी.एस.सी. या विषयावर मोफत कार्यशाळा आयोजित केली होती. बोराळकर पुढे म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, आत्मविश्वास असला पाहिजे. आपल्या ब्रेनचा आपण योग्य वापर केला तर निश्चितच जिंकू शकतो हा विश्वास व्यक्त केला. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाची माहिती करून घेऊन नियमित अभ्यास करावा हे त्यांनी विविध उदाहरणांच्या साहाय्याने पटवून दिले. यावेळी बोलताना प्रा.रंगराम मोकाशी यांनी विद्यार्थ्यांना एम पी एस सी च्या विविध परीक्षांची माहिती दिली विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या आहारी न जाता. आयुष्यात तुम्हाला काय मिळवायचे आहे याचा विचार करावा तसेच मोबाईलचा अतिवापर टाळण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे म्हणाले विद्यार्थ्यांनी आव्हाने स्वीकारावीत नवनवीन स्वप्ने पहावीत व ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. आजची तरुण पिढी समाज माध्यमांच्या प्रभावाखाली वावरत आहे. प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख प्रा.प्रभाकर पाटील यांनी केले तर आभार डॉ.के.एन.पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले. यावेळी कॅप्टन विनोदकुमार कुंभार, डॉ.नितीन गायकवाड, डॉ.अमित माळी, प्रा.अजय तरंगे, प्रा.रणजीत कुंभार यांसह महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.