स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे – डॉ.अच्युत गोडबोले

वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन

तासगाव, दि.23 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तरुणांनी संशोधन करणे गरजेचे आहे आपण आपल्या क्षेत्रात एक्सलंट असलं पाहिजे स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे असे उद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ, साहित्यिक डॉ.अच्युत गोडबोले यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे तिसर्‍या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले. ते पुढे म्हणाले जीवनात यशस्वी होण्यासाठी इंग्रजी भाषा आत्मसात करावी संवाद कौशल्य अवगत करून चांगला संशोधक व्हावं ,संगणकाचे ज्ञान आत्मसात करून तंत्रस्नेही बनले पाहिजे. यावेळी बोलताना सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय (काका) पाटील यांनी चर्चासत्राला शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानावरून बोलताना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ.राजेंद्र शेजवळ यांनी या परिषदेचे महत्त्व सांगून येणाऱ्या काळातील संशोधनाची गरज सांगितली.कार्यक्रमाचे स्वागत स्वागताध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सांगली विभाग प्रमुख,आजीव सेवक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आंतरराष्ट्रीय परिषदेचे निमंत्रक डॉ.शंकर खाडे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रा.प्रभाकर पाटील यानी केला.तर आभार डॉ.अजय अंभोरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अलका इनामदार ,प्रा.सविता कोळेकर ,डॉ.मेघा पाटील , प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले. यावेळी ‘माय कॉलेज बुलेटीन’ अंकाचे आणि परिषद स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाला तासगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील , प्राचार्य व्ही.एच.पाटील , डॉ.नरेंद्र कुलकर्णी, डॉ.जीवन घोडके, डॉ.सुरेश खाबडे, प्रा.बी.एस. हराळे , डॉ.पी.बी.तेली, डॉ. स्वाती जाधव , डॉ. सचिन शिंदे , डॉ.अर्जुन वाघ , उपप्राचार्य जे.ए.यादव , डॉ. शहाजी पाटील , डॉ.आर.एम. गणेशवाडे, डॉ.आर.ए. काळेल ,प्रा.जी.के.पाटील यांसह भारतातील विविध राज्यातून संशोधक प्राध्यापक ,व संशोधक विद्यार्थी ,महाविद्यालयातील ज्युनिअर सिनियर विभागातील सर्व प्राध्यापक ,प्रशासकीय सेवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज दिवसभरात डॉ.ज्योती जाधव , डॉ.सुमित कांबळे डॉ.एम.टी.गोफणे ,डॉ.एस. डी. डेळेकर ,डॉ.एम.बी.मुळे यांची विविध विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्याने संपन्न झाली. दुपारच्या सत्रात पोस्टर प्रेसेंटेशनस व ओरल प्रेसेंटेशनस संपन्न झाली. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाने दिवसभरातील कार्यक्रमाची सांगता झाली.