शिराळा, दि.19 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) प्रत्येक गावामध्ये विविधांगी समाजशील सेवाभावी संस्था काम करत असतात. परंतु बिळाशी येथील स्वराज्य फाउंडेशन ही एक सामाजिक वसा जोपासणारी संस्था असुन या संस्थेचे काम प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन कोकरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते यांनी केले. बिळाशी (ता. शिराळा ) येथील भैरवनाथ देवाच्या पालखी सोहळ्यासाठी खास करुन ते उपस्थित राहिले होते. ‘स्वराज्य फाउंडेशन’ चे संस्थाध्यक्ष डॉ. एन.के.पाटील, बिळाशी ग्रामस्थ यांचेवतीने महेश मोहिते, त्यांचे पोलिसी सेवेतील सहकारी यांचा यांचा पोलिसी सेवेतील उत्कृष्ठ सेवेचा सन्मान झाला. पुण्याच्या वनविभागात उपवनरक्षक या पदावर कार्यरत असणारे राहुल पाटील सदैव आपल्या गावासाठी सातत्याने विविधांगी उपक्रम राबवत असतात. स्वराज्य फाउंडेशन पदाधिकाऱ्यांनाही त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन असते. वनविभागासारख्या जबाबदारी सेवेत चांगले काम बजावून आपल्या आपल्या गावासाठी ते सातत्याने झटतायत, विशेषतः अनेक युवकांना ते मार्गदर्शन करतायत हि बाब कौतुकास्पद असल्याच्या भावना श्री मोहिते यांनी व्यक्त केल्यात. आनंदराव पाटील, वैभव सातपुते, सागर पाटील, प्रकाश पाटील, विकास देशमाने, उमेश नवाळे, नागेश शिंदे, डि.के. कुंभार, नाना फडतरे राजेंद्र जंगम, बशीर मुलानी रत्नागिरीचे पोलीस रवी पाटील आदींसह फुटबॉल युवा ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
