तासगाव, दि. १९ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुका हा क्रीडापंढरी म्हणून नावलौकीक मिळवून देण्यात या भूमीतील अनेक खेळाडुंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवले आहे. यात भर घालत स्वराज्य फौंडेशनच्या खेळाडुंनी पाटणा येथे झालेल्या नॅशनल इंटर डिस्ट्रिक्ट स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आणि ते ही किरण माने यांच्या कुटुंबातील दोन बहिणींनी ही अभिमानाची बाब आहे. त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य असुन त्यांना प्रोत्साहित करणे हि आपली जबाबदारी आहे. त्यांच्या रूपाने महाराष्ट्र आणि देशात तासगावचे नाव पुन्हा एकदा उज्वल झाले आहे असे प्रतिपादन रोहीत दादा पाटील यांनी केले. ज्युनियर अथलेटिक्स मीटर या स्पर्धेत १४ वर्षाखालील ट्रायथलॉन ‘बी’ या गटात कु. वर्षा किरण माने ही देशात २२ वी तर, महाराष्ट्रात ३ री आली. तसेच ट्रायथलॉन ‘सी’ या गटात कु. वैष्णवी अमोल माने हिने संपूर्ण देशात ४४ वा तर, महाराष्ट्रात ४ था क्रमांक मिळवाला प्रशिक्षक अंकुश कलगुटी यांचाही सत्कार रोहीत दादांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी, स्वराज्य फाउंडेशन सर्व खेळाडू व उपाध्यक्ष कृष्णा माळी , अभिजित पवार यांनी दिलेले प्रोत्साहन म्हणजे यश असे रोहितदादांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या यशावर बोलतांना स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष किरण माने म्हणाले, ‘आज या मुलींचा सत्कार होत असताना मला अत्यानंद होत आहे. माझ्या कुटुंबातील दोन कन्यांनी मिळवलेले राष्ट्रीय पातळीवरील यश म्हणजे तासगावच्या क्रीडा क्षेत्राची यशगिरी होय, भविष्यात खेळाडूंच्या साठी अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असे त्यांनी सांगितले यावेळी, प्राध्यापक जी के पाटील, राष्ट्रवादी तासगाव शहराध्यक्ष ॲड गजानन खुजट अभिजीत कोळेकर, पवन माने, स्वप्नील पाटील, मेट्रो फायनान्सचे प्रो.प्रा. अभिजीत माने, पत्रकार दिलीप जाधव, हर्ष घाडगे अमोल माने आदी सर्व उपस्थितांचे आभार पत्रकार अजित माने यांनी मानले.

.