स्वामी रामानंद भारती सूतगिरणी च्या वतीने आर. आर. आबांना अभिवादन

तासगाव, दि. 20 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) येथील स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणी लि., तासगांव या संस्थेच्या कार्यस्थळावर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री स्व. आर. आर. आबा पाटील यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने अभिवादन करण्यात आले. चेअरमन पांडुरंग पाटील आणि हा. चेअरमन सिदगोंडा पाटील यांचे हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी प्रा. अशोक पवार, विजय जाधव, संचालक ए. बी. पवारसर, राहुल कांबळे, बाळासाहेब देशमुख, दिनकर पाटील, मारूती गुरव व सर्व संचालक, जनरल मॅनेजर तुकाराम जाधव, पर्सोनेल मॅनेजर सचिन कुलकर्णी तसेच कर्मचारी व कामगार उपस्थितीत होते.