तासगाव, दि.14 सप्टेंबर 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील रुक्मिणी शहाजी पाटील (वय 76) यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. प्रसिद्ध गलाई व्यावसायिक सुनील पाटील यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. 16 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता बस्तवडे येथे होणार आहे.
