तासगावात आर.ओ. असोसिएशचे शिबिर उत्साहात संपन्न

डॉ.महेश पाटील यांच्या मार्गदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

तासगाव, सोमवार दि. 7 सप्टेंबर 2026(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) आर. ओ. वॉटर असोसिएशन, तासगाव तालुका यांच्या वतीने उद्योगातील व्यावसायिकांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये फूड इंडस्ट्रीज मधील संशोधक डॉ. महेश पाटील यांनी आर. ओ. उद्योगातील बदलते नियम, गुणवत्ता टिकविण्याचे महत्त्व आणि भविष्यातील व्यवसायाच्या संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उद्योगाची गुणवत्ता, पाण्याची गुणवत्ता व मानके, पाणी तपासणी प्रक्रिया, FSSAI रजिस्ट्रेशन, नवीन शासकीय नियमावली, उद्योगातील समस्या व त्यावरील उपाय, व्यवसायातील संधी, नवीन तंत्रज्ञान व गुणवत्ता नियंत्रण तसेच FSSAI संबंधित अद्ययावत माहिती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित आर. ओ. व्यावसायिकांनी विविध प्रश्न उपस्थित करून चर्चेत सहभाग घेतला.“एकत्र येऊया, ज्ञान मिळवूया, व्यवसाय वाढवूया!” या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे आर. ओ. व्यावसायिकांना उद्योगाशी संबंधित नियम, गुणवत्ता व तांत्रिक बाबींबाबत उपयुक्त माहिती मिळाली.यावेळी असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत अध्यक्ष भालचंद्र काटकर यांनी केले. प्रास्ताविक मयूर लाड यांनी केले. सूत्रसंचालन संजय माळी यांनी केले तर आभार संतोष जाधव यांनी मानले. असोसिएशनच्या पुढाकारातून झालेल्या या मार्गदर्शन शिबिराचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.