आ.रोहित पाटील यांच्या वतीने उपक्रमाचे आयोजन
तासगाव, रविवार दिनांक- 16 नोव्हेंबर 2025, (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव – कवठेमंकाळ विधानसभा मतदार संघांचे आमदार रोहित दादा पाटील यांच्या वतीने संपूर्ण मतदार संघात मोफत नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत कुमठे येथील शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात १०० हून अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिरात नेत्र तपासणी, सवलतीच्या दरात चष्मा वाटप तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सवलतींचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला. आर आर. पाटील ज्ञानप्रबोधिनी तासगांव यांच्या सहकार्याने आणि अग्रणी रुर्बन डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमामुळे नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.
