Deprecated: कार्य WP_Dependencies->add_data() हे एका तर्कासह अप्रचलित केले गेले आहे जे आवृत्ती 6.9.0 पासून आहे! IE कंडिशनल टिप्पण्या सर्व समर्थित ब्राउझरद्वारे दुर्लक्षित केल्या जातात. in /home/dh_gjvbks/maharashtramarathinews.in/wp-includes/functions.php on line 6131
माजी खासदार संजय काका पाटील वर भाजपा किसान मोर्चाचे संदीप आबा गिड्डे यांची उपस्थिती चर्चेचा विषय
तासगाव, शुक्रवार दिनांक- 19 डिसेंबर 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) – राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी माजी खासदार संजय काका पाटील, भाजप किसान मोर्चा चे संदीप आबा गिड्डे यांची उपस्थिती हाच चर्चेचा विषय ठराला. सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने अनेक राजकीय मंडळींचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झाला. या प्रवेश समारंभासाठी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तासगाव येथील विटा रोड वरील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या समोरच स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रताप पाटील, तालुका अध्यक्ष सचिन पाटील, अरुण खरमाटे, आर. डी. पाटील, दिनेश पवार, अजय पाटील, ज्योती पाटील यांच्या सर्व पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी केलं स्वागत. यावेळी माजी खासदार आपल्या प्रमुख कार्यकर्तासह उपस्थितीत होते. संजय काका यांची उपस्थिती आणि त्यांनी केलेला सत्कार हाच चर्चेचा विषय ठरला. नेमकं याच वेळी भाजप किसान मोर्चाचे संदीप आबा गिड्डे यांची उपस्थिती सुद्धा चर्चेचा विषय ठरला. अजित पवार यांची जनसपंर्क कार्यालयास सदिच्छा भेट होती पण पुढील कार्यक्रमामुळे त्यांची कार्यालयास भेट होऊ शकली नाही त्यामुळे त्याचा सत्कार रस्त्यावर गाड्यांचा ताफा थांबवून करण्यात आला. मात्र यावेळी महायुतीचे घटक पक्ष भाजपा वर शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या पदाधिकाऱ्यांच्या पैकी कोणीच या सत्कारासाठी उपस्थिती राहिले नाहीत.
औपचारिक भेट – संजय काका पाटील – राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ते आपल्या गावामध्ये येत आहेत. काही वर्षे आम्ही एकत्रित एका पक्षामध्ये काम केले असल्याने, अतिथी म्हणून आपल्या भागात येत असल्याने अजित दादांचा सत्कार करणे माझे कर्तव्य आणि औपचारिकता आहे. यामध्ये कोणीही राजकीय अर्थ काढू नये. असं खुलासा माजी खासदार संजय काका पाटील यांनी केला.
‘महायुती’ असल्यामुळे भेट घेतली – संदीप आबा गिड्डे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महायुतीचा घटक पक्ष आहे. तसेच अजितदादा हे राज्याची उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते आपल्या भागात आल्यावर त्यांची भेट घेणे आणि महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान करणे यात काहीच गैर नाही. हा पक्षाचा प्रोटोकॉल आहे. असा खुलासा भाजपा मोर्चाचे संदीप आबा गिड्डे यांनी केला.