पत्रकार गजानन कुलकर्णी यांचे निधन

तासगाव, शुक्रवार दिनांक – 19 डिसेंबर 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव येथील ज्येष्ठ पत्रकार गजानन कुलकर्णी यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. ते 57वर्षांचे होते. त्यांनी तालुक्यात आघाडीच्या विविध दैनिकांमध्ये तसेच विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमात ग्रामीण बातमीदार म्हणून उठावदार काम केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, सुना असा परिवार आहे. अंत्यविधी कोल्हापूर येथे पंचगंगा घाटावर करण्यात आले.