सोन्याच्या दागिन्यांसह सव्वादोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत, सांगली एलसीबीची कारवाई
तासगाव, मंगळवार दिनांक – 6 जानेवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) गेल्या आठवड्यात 30 डिसेंबर 2025 रोजी विटा शहरातील सूर्यनगर येथील मरीमा मंदिरात अज्ञात चोरट्याने देवीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग शाखा सांगली यांनी आमणापुर ता. पलूस येथील सराईत गुन्हेगार प्रकाश जगन्नाथ सदामते वय वर्ष 32 यास तासगाव तालुक्यातील नागाव कवठे येथे सापळा रुचून अटक केली. त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीचे 12 ग्रॅम सोन्याची देवीची मंगळसूत्रे व सत्तर हजार रुपये किंमतीची टीव्हीएस मोटरसायकल हस्तगत केली. हा गुन्हा अवघ्या सात दिवसात उघडकीस आणला त्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या टीमचे अभिनंदन केले. या कारवाईमध्ये हणमंत लोहार, संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, अतुल माने, शिवाजी शिद, अभिजीत ठाणेकर, प्रमोद साखरपे, सुनील जाधव, सोमनाथ पतंगे, रोहन धस्ते, अजय पाटील, अभिजीत पाटील यांनी सहभाग घेतला.
