मणेराजुरी जिल्हा परिषद गटातून शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला उमेदवारी अर्ज
तासगाव, मंगळवार – दिनांक 20 जानेवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज) सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून समाजसेवा व राजकारण करणाऱ्या स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या विचाराचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठीच मी माझी उमेदवारी अर्ज भरला असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश पवार यांनी सांगितले. मणेराजुरी जिल्हा परिषद गटातून आज शक्ती प्रदर्शन करीत सतीश पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटातून दाखल केला. माजी आमदार सुमनताई पाटील व विद्यमान आमदार रोहित पाटील यांनी माझ्यावरती टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवू आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू असे त्यांनी यावेळी सांगितले.

