मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठीच माझी उमेदवारी – मोहन पाटील

मांजर्डे जिल्हा परिषद गटातून दाखल केला उमेदवारी अर्ज

तासगाव, मंगळवार – दिनांक 20 जानेवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना न्याय देणे व मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधने हेच माझे उद्दिष्ट आहे. आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मांजर्डे जिल्हा परिषद गटातून मी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती मोहन पाटील यांनी दिली. मांजर्डे जिल्हा परिषद गटातून शक्ती प्रदर्शन करीत मोहन पाटील यांनीआपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मतदार संघातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.