राष्ट्रवादी व शिवसेना दोन्ही पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल, पूर्ण ताकतीनशी निवडणूक लढण्याचा निर्धार
तासगाव, बुधवार दिनांक 21 जानेवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यात सर्वात लक्षवेधी ठरत असलेल्या विसापूर जिल्हा परिषद व विसापूर पंचायत समिती च्या निवडणुकीच्या रिंगणात प्रा. डी ए माने सर यांनी आपला आज उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी सविता लष्करे व तहसीलदार अतुल पाटोळे यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट व शिवसेना एकनाथ शिंदे गट या दोन्ही पक्षांकडून दोन्ही गटात आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असून, आज पर्यंतच्या केलेल्या समाजिक कार्याच्या आणि राजकीय कार्याच्या जोरावर आपण पूर्ण क्षमतेने आणि ताकतीनिशी निवडणूक लढणार असल्याचा विश्वास प्रा. डी ए माने सर यांनी व्यक्त केला. यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर नेत्यांशी चर्चा झाली असून आपली उमेदवारी निश्चित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

